१ जुलैपासून किया कार महागणार! ‘Kia India price hike from 1 July 2026’ मुळे तुमच्या आवडत्या मॉडेलची किंमत किती वाढली? त्वरित पहा!

Kia India price hike from 1 July 2026 : दर्शकांनो तुम्ही जर जुलै महिन्यात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमच्या आवडत्या वाहनासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार हे नक्की कारण किया कार इंडिया कंपनीने १ जुलैपासून आपल्या सर्व वाहनावर २% नी दरात वाढ करणार असल्याची घोषणा केलेली आहे

भारतीय बाजारपेठात दिवसेंदिवस वाहनांच्या दरात वाढ प्रत्येक कंपनी करत असताना दिसून येते जसे की मागील महिन्यात टाटा मोटर्स ने घोषणा केली होती की तेही २ टक्क्यांनी दरात वाढ करेल. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत किया इंडिया कंपनीने १ जुलै २०२६ पासून आपल्या सर्व वाहनांच्या मॉडेलवर २ टक्क्यांनी वाढ जाहीर केलेले आहे कंपनीचे म्हणणे असे आहे की वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि परिचालन खर्चात होणाऱ्या वाढीमुळे हा निर्णय कंपनीने घेतलेला आहे.

Kia India price hike from 1 July 2026
१ जुलैपासून किआ कार महागणार! ‘Kia India price hike from 1 July 2026’ मुळे तुमच्या आवडत्या मॉडेलची किंमत किती वाढली? त्वरित पहा!

किया कंपनी दरात वाढ का करत आहे?

गेल्या काही वर्षात वाहन बनवणाऱ्या कंपनीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीने वाढत्या कमोडिटी आणि लॉजिस्टिकचा खर्चाचा भार स्वतः सहन करत आलेले आहे मात्र या वाढत्या स्टील , अल्युमिनियम , प्लास्टिक , सेमीकंडक्टर आणि वाहतूक खर्चामध्ये होत असणाऱ्या वाढीमुळे कंपनीला हे करणे आता शक्य होत नाही त्यामुळे आपले नफ्याचे मार्जिन राखण्यासाठी कंपनीने हा खर्च ग्राहकावर टाकण्याचा काम केले आहे.
कंपनी दरामध्ये वाढ पण अशावेळी करत आहेत जेव्हा ते आपले इलेक्ट्रिक वाहनांचा पोर्टफोलिओ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच भविष्याला पाहून तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याचे काम कंपनीकडून होत आहे. अशा वरील प्रमुख कारणामुळे कंपनी दरवाढ करत आहे.

कोण कोणत्या मॉडेल्स वर याचा परिणाम होईल?

या कंपनीकडून केलेल्या वाढीव दराचा परिणाम कंपनीच्या सर्व वाहनावर होणार आहे जसे की Kia sonet , Kia Syros , Kia seltos , Kia Careñs , Kia Careñs Clavis , Kia Carnival , Kia EV6 , Kia EV9 हे सर्व मिळून या कंपनी भारतामध्ये एकूण नऊ मॉडेल्स ची विक्री करत आहे.

अंदाजे प्रत्येक मॉडेलवर किमतीमध्ये किती वाढ होईल याचा तक्ता खालील प्रमाणे दिलेला आहे ते तुम्ही सविस्तरपणे पाहू शकता.

 

गाड्यांचे मॉडेलदरवाढ पूर्वीची किंमत (अंदाजे)२% नुसार किमतीमध्ये होणारी वाढ (अंदाजे)
Kia Sonet₹8,00,000₹16,000
Kia Syros₹9,00,000₹18,000
Kia Seltos₹11,00,000₹22,000
Kia Carens₹11,50,000₹23,000
Kia Carens Clavis₹12,00,000₹24,000
Kia Carnival₹63,00,000₹1,26,000
Kia EV6₹66,00,000₹1,32,000
Kia EV9₹1,30,00,000₹2,60,000

टीप: वरील आकडे हे संबंधित मॉडेलच्या सुरुवातीच्या (एक्स-शोरूम) किमतींवर आधारित अंदाजे  २% नुसार किमतीमध्ये होणारी वाढ दर्शवत आहेत तसेच  प्रत्यक्ष दरवाढ प्रत्येक व्हेरिएंटनुसार वेगळी असू शकते. २% दरवाढीचा परिणाम कमी किमतीच्या मॉडेल्सवर काही हजार रुपयांपासून तर प्रीमियम आणि इलेक्ट्रिक मॉडेल्सवर लाखो रुपयांपर्यंत होऊ शकते.

 

ग्राहकांना याचा फायदा कसा घेता येईल?

किया कंपनीने घोषणा केल्यापासून ग्राहकांनी या गोष्टीचा फायदा करायचा असेल तर त्यांनी वाढीव किंमत टाळण्यासाठी 30 जून 2026 च्या पूर्वी गाडी बुक करून नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला या कंपनीच्या या दरवाढीचा फटका बसणार नाही आणि सद्यस्थितीच्या दरामध्ये तुम्हाला गाडी खरेदी करण्याचा मोका मिळू शकतो.

 

Kia India price hike from 1 July 2026
१ जुलैपासून किआ कार महागणार! ‘Kia India price hike from 1 July 2026’ मुळे तुमच्या आवडत्या मॉडेलची किंमत किती वाढली? त्वरित पहा!

 

१  जुलै २ ० २ ६  पासून होणारे या किंमत वाढीमुळे किया इंडियाच्या कार विक्रीवर काय परिणाम होईल

  •  कमी काळामध्ये विक्रीमध्ये वाढ होईल जसे की किंमत वाढण्यापूर्वी पैसे वाचण्यासाठी ग्राहक ३ ०  जून २ ० २ ६  पूर्वी मोठ्या प्रमाणावर गाड्यांची बुकिंग करतील यामुळे जून महिन्यात या कंपनीच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येईल. तसेच ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे डीलरशिपला त्यांच्याकडील जुना स्टॉक सहजपणे विकता येईल.
  • एक जुलै उजाडताच किया कंपनीच्या वाढत्या दरामुळे नवीन खरेदीदार वाहन खरेदी करण्यापूर्वी विचार करतील त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात विक्रीचा वेग मंदावणार हे नक्की. तसेच बजेट मधल्या ग्राहकांना जसे की किया सोनेट यासारख्या गाड्यांचे बेस मॉडेल घेणारी बजेट बाबत खूप संवेदनशील असतात त्यामुळे इतर कंपन्यांच्या स्वस्त पर्यायाकडे वळू शकतात.
  •  वाढलेले किंमत ग्राहकांना बरी वाटावी यासाठी कंपनीकडून काही नवीन फीचर्स किंवा गाड्यांमध्ये किरकोळ बदल करू शकते. तसेच किंमत वाढीचा फटका कमी करण्यासाठी फायनान्स वर आकर्षक व्याजदर किंवा कमी  डाऊन पेमेंट किंवा एक्स्चेंज बोनस यांसारख्या ऑफर्स  तुम्हाला दिल्या जातील

 

आजच्या १९ जून २०२६ नुसार या किया कंपनीच्या गाड्यांचे दर

गाड्यांचे मॉडेलसध्याची किंमत (एक्स-शोरूम)
Kia Sonet₹7.33 लाख पासून
Kia Syros₹8.42 लाख पासून
Kia Seltos₹11.00 लाख पासून
Kia Carens₹11.02 लाख पासून
Kia Carens Clavis₹11.23 लाख पासून
Kia Carnival₹59.45 लाख
Kia EV6₹65.97 लाख
Kia EV9₹1.30 कोटी

 

१ जुलैपासून किआ कार महागणार! 'Kia India price hike from 1 July 2026' मुळे तुमच्या आवडत्या मॉडेलची किंमत किती वाढली? त्वरित पहा!
Kia India price hike from 1 July 2026

निष्कर्ष

ग्राहकांनो किया इंडियाने १ जुलै २०२६ पासून घेतलेल्या किंमत वाढीचा निर्णय वाहन उद्योगातील वाढत्या इनपुट आणि परिचालन खर्चामुळे अनिवार्य ठरलेल्या दिसून येतो त्यामुळे तुम्हाला याचा थेट परिणाम असा होणार की कंपनीची सर्व लोकप्रिय कार आता 2% नी महाग होतील.
वरील सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला या कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ३० जून २०२६ पूर्वी बुकिंग करणे हा या वाढीव खर्चापासून वाचण्याचा सर्वात सोपा आणि तुमच्यासाठी फायदेशीर मार्ग ठरणार आहे.