2026 Mercedes Benz S Class facelift launched : जर्मन देशाची लोकप्रिय मर्सिडीज बेंज या ब्रँड ने भारतात आपली बहुप्रतीक्षित 2026 S-Class मर्सिडीज बेंज फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केलेले आहे. आणि या आधुनिक तंत्रज्ञानाची मिशाल असलेल्या गाडीची सुरुवाती किंमत ₹२.२० कोटी (एक्स शोरूम) आहे. ह्या वाहनामध्ये कंपनीचे नवीन डिझाईन , आधुनिक तंत्रज्ञानाची भरणा आणि भारतातील सर्वोत्तम सेफ्टी फीचर्स देणारी ही कार ज्यामध्ये कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदा प्लग-इन हायब्रीड हा पर्याय सोबत येत आहे.
सिडान सेगमेंट मध्ये येणारे हे वाहन गाडीच्या बाहेरून आणि आत मधून स्टाईल मध्ये खूप बदल केला दिसून येतो आणि गाडीच्या तंत्रज्ञानामध्येही खूप आधुनिकतेवर भर देण्यात आलेला आहे तसेच त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्लग इन हाइब्रिड पावर ट्रेन सोबत कंपनीने भारतामध्ये लॉन्च केलेली आहे. चला पाहूया विस्तार मध्ये 2026 S-Class वाहनांची संपूर्ण माहिती….

इंजन
मर्सिडीज बेंज कंपनीने S 450e प्लग इन हाइब्रिड या नव्याने विजेवर चालणाऱ्या तंत्रज्ञानाचा या वाहनांमध्ये वापर केलेला आहे या गाडीच्या इंजनमध्ये ३.० लिटर टर्बो चार्ज सिक्स पेट्रोल इंजिन आहे. तसेच यामध्ये 22 किलो वॅट लिथियम आयर बॅटरी पॅक मिळतो आणि दोन्ही इंजिनचे एकत्रितपणे 435 hp ची ताकद आणि ६८०nm चा टॉर्क निर्माण होतो तसेच ही गाडी ९ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये येते
एक्सटीरियर डिझाईन
या वाहनाचे एक्सटेरियर मध्ये खूप बदल केलेले दिसून येतात जसे की कालच्या पुढील भागात 20 टक्के पेक्षाही जास्त मागील मॉडेलच्या तुलनेत मोठी एलुमिनेटेड ग्रील देण्यात आलेले आहेत तसेच नवीन डिझाईनचा भाग म्हणून स्टार टीम मध्ये डिजिटल एलईडी हेडलाईट देण्यात आलेले आहेत त्यामुळे गाडी समोरून खूप धाकड दिसते. तसेच मागील टेल-लॅम्प मध्येही त्यांच्या सिग्नेचर स्टार स्टाईल मधले नवीन स्टाईल डिझाईन समाविष्ट करण्यात आलेले आहे जे की वाहनावर खूप चांगल्या प्रकारे जुळून दिसते. गाडीच्या नव्याने डिझाईन केलेले बंपर हे या वाहनांवर खूप आकर्षक रोड प्रेझेंस देते
इंटिरियर डिझाईन
गाडीचे इंटेरियर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा भरमसाठ वापर केलेला दिसून येतो जसे की गाडीच्या केबिनमध्ये डॅशबोर्ड वर मोठी सुपर स्क्रीन आणि प्रगत एमबी ओ एस आर्किटेक्चर दिलेले आहे जे वाहन चालताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर करता येईल आणि सुरक्षेसाठी आणि युजर ओळखीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर ऐवजी फेशियल रिक्रेशन दिले गेले आहे ज्यामुळे या गाडीची सुरक्षितता अजून वाढलेली आहे.
वाहनांची मागील सीट ही एक्सक्लिजिटिव्ह रियर सीट ह्या नावाने ओळखते ज्यामध्ये सीट ४३.५ डिग्री पर्यंत आपल्याला मागे सारून झोपता येऊ शकते तसेच या गाडीच्या प्रत्येक सीटवर आपल्याला व्हेंटिलेशन , हीटिंग आणि मसाजचा यांसारखे सुविधा उपलब्ध आहेत
वाहनामध्ये ॲम्बिअन्स लाइटिंग सिस्टीम देण्यात आलेले आहे जे की इंटेरियर मध्ये डॅशबोर्ड , फुटरेस्ट , डोर पॅड , सेंटर कन्सोल , आमरेस्ट आणि कप होल्डर , एसी मध्ये पाहायला मिळणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञान
आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणून या वाहनांमध्ये ड्रायव्हरचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित करण्यात आली अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान झालेले आहे जसे की प्रगती इम्पोर्टेन्टमेन्ट आणि एआय जसं की ह्या पिक्चर्स मध्ये हायपर स्क्रीन देण्यात आलेले आहे ज्याचे काम डॅशबोर्ड वर एक मोठा आणि आकर्षक कात्रज डिस्प्ले म्हणून काम करते ज्यामध्ये ड्रायव्हर सेंटर आणि को ड्रायव्हर साठी स्वतंत्र स्क्रीन मिळतात.
Ai चा वापर असा केलेला आहे जसे की हाय मर्सिडीज हा असिस्ट आता चॅटजीपीटी सारखा प्रगत Ai तंत्रज्ञानावर आधारित आहे जो तुमच्याशी नैसर्गिक भाषेत संवाद साधू शकणार आहे आणि गाडीचे फीचर्स नियंत्रित करू शकतो.
तसेच यामध्ये जिरो लेयर इंटरफेस नावाचे फीचर्स आहे ज्यामध्ये स्क्रीनवर वारंवार लागणारे फीचर्स समोर दिसतात त्यामध्ये मेनू मध्ये सोडण्याची गरज पडत नाही
स्वयंचलित अपडेट्स कारचे सॉफ्टवेअर घरबसल्या इंटरनेट द्वारे अपडेट होते ज्यामुळे नवीन फीचर्स साठी सर्विसिंग सेंटर जावे लागत नाही तसेच कार मध्ये थेट गुगल मॅप्स इन बिल्ड देण्यात आलेले आहेत जे लाईव्ह ट्रॅफिक आणि सॅटॅलाइट व्हू दाखवते.
सेफ्टी फीचर्स
- मर्सिडीजच्या या S-class वाहनांमध्ये सेफ्टी फीचर्स मध्ये अनेक जागतिक दर्जाची पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह सेफ्टी फीचर्स देण्यात आलेले आहेत जसे की एअर बॅग आणि पॅसिव्ह सेफ्टी यामध्ये सर्वात लोकप्रिय आणि महत्त्वाचे नवीन एस क्लास ही भारतातील पहिली कार आहे ज्यामध्ये तब्बल 15 एअर बॅग कंपनीकडून देण्यात आलेले आहेत.
- तसेच मागच्या सीटर बसणाऱ्या प्रवासांसाठी जगात पहिल्यांदा समोरील बाजूने उघडणारी विशेष एअरबॅग मिळतात आणि अपघात झाल्यास मागच्या सीडचे सीटबेल्स देखील एअरबॅग सारखे फुटतात ज्यामध्ये छातीवर दाब कमी होतो यांसारखे प्रगतशील एअरबॅग सेफ्टी दिल्यामुळे तुमचा धोका कमी होतो.
- वाहनामध्ये प्रगत ADAS लेव्हल दोन ची सेफ्टी देण्यात आली आहे ज्यामध्ये ५ रडार , १० एक्स्टर्णल कॅमेरे आणि १२ अल्ट्रासोनिक सेंसर चे जाळे वाहनांमध्ये पसरलेले आहे
- वाहनांमध्ये अपघातापूर्वी पूर्व सुरक्षिता नावाची सिस्टीम देण्यात आलेली आहे त्यामध्ये जर कारला बाजूने अपघात किंवा आगात होणार असेल तर कारचे ऍक्टिव बॉडी कंट्रोल सस्पेन्शन कारची उंची काही मिलिमीटरने अचानक वाढवते यामुळे अपघाताचा फटका कारच्या मजबूत भागाव बसतो आणि प्रवासाचे जीवाचे रक्षण होते.
- तसेच अपघात होण्याचे काही सेकंद आधी कारच्या ऑडिओ सिस्टीम मधून एक विशेष ध्वनी येतो हा आवाज मानवी कानाच्या पडद्याला अपघाताच्या मोठ्या आवाजापासून सुरक्षित ठेवण्यासाठी बनवला गेलेला आहे.

व्हेरियंट
मर्सिडीज कंपनीची ही २ ० २ ६ मर्सिडीज बेंज एस क्लास भारतात प्रामुख्याने दोन प्रमुख पेरेंट्स मध्ये लॉन्स करण्यात आलेली आहे
१) S 450e लाॅन्च एडिशन (exclusive line)
या गाडीची किंमत ₹ 2.20 कोटी एक्स शोरूम भारतामध्ये मिळते आणि हा ह्या कारचा बेस वेरेंट आहे.
२) S 450e मेन्यूफाक्टूर एडिशन (AMG line)
या गाडीची किंमत 2.28 कोटी एक शोरूम भारतामध्ये मिळते आणि हा या वाहनाचा टॉप-स्पेक आणि अधिक प्रीमियम व्हेरियंट आहे
गाडीचे कलर्स
२०२६ मर्सिडीज बेंज हे वाहन एकूण ९ आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत यामध्ये स्टॅंडर्ड आणि मर्सिडीजचे विशेष प्रीमियम कस्टमर रंग समाविष्ट आहेत
पहिला S 450e लॉन्च एडिशन च्या रंगाचे पर्याय या मॉडेलमध्ये एकूण चार मुख्य मेटॅलिक रंग मिळतात
- कार्नियल रेड मेटॅलिक
- सिल्वर मेटॉलिक
- क्रोमाइटी ब्लॅक मेटॉलिक
- एलानाइट ग्रीन मेटॅलिक
दुसरे S 450e मॅन्युफाक्टूर एडिशन
या टॉप वेरिएंटमध्ये ग्राहकांना अधिक प्रेमियम आणि मर्सडीजचे खास कस्टमर रंग निवडण्याची मुभा कंपनीकडून मिळते.
- ओपलाइट व्हाइट ब्राइट
- ऑब्सिडियन ब्लैक
- एमरल्ड ग्रीन
- वर्डे सिल्वर
- वेल्वेट ब्राउन
स्पेस आणि व्यवहारिकता
या वाहनांमध्ये केबिनमध्ये मिळणारी जागा आणि आराम हा या कारचा सर्वात मोठा मजबूत मुद्दा आहे ही कार प्रामुख्याने लांब विल बेस मॉडेल मध्ये येते ज्यामुळे प्रवाशांना चांगला प्रकारचा अनुभव मिळतो.
गाडीची डिक्की मध्ये सुमारे 550 लिटरची बूट स्पेस मिळतो. तसेच हे वाहन प्लग इन हायब्रीड वेरियट असल्यामुळे बॅटरी पॅक मागच्या बाजूला बसवला आहे त्यामुळे बॅटरी आणि चार्जिंग केबल मध्ये थोडी जागा कमी होते तरीही तीन ते चार मोठ्या बॅगा सहज ठेवता येतील एवढी जागा डिक्की मध्ये आपल्याला मिळून जाते.

स्पेसिफिकेशन
या वाहनाचे स्पेसिफिकेशन खालील प्रमाणे दिलेले आहेत
| वैशिष्ट्य | तपशील |
|---|---|
| मॉडेल व्हेरियंट | S 450e (प्लग-इन हायब्रिड – PHEV) |
| इंजिन प्रकार | ३.० लिटर, ६-सिलेंडर इनलाइन टर्बो-पेट्रोल |
| इंजिन क्षमता (Displacement) | २,९९९ cc |
| इलेक्ट्रिक मोटर | १६१ bhp (१२० kW) मोटर |
| संयुक्त कमाल पॉवर (Combined Power) | ४३५ hp |
| संयुक्त कमाल टॉर्क (Combined Torque) | ६८० Nm |
| गिअरबॉक्स (Transmission) | ९-स्पीड ऑटोमॅटिक (9G-TRONIC) |
| ड्राइव्ह प्रकार (Drivetrain) | रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) |
बॅटरी, रेंज आणि परफॉर्मन्स
| वैशिष्ट्य | तपशील |
|---|---|
| बॅटरी क्षमता (Battery Capacity) | २२ kWh (लिथियम-आयन) |
| केवळ इलेक्ट्रिक मोडवरील रेंज | सुमारे ११५ किमी |
| चार्जिंग वेळ (DC Fast Charger) | २० मिनिटे (१०-८०% चार्ज, ६० kW चार्जरवर) |
| इंधन कार्यक्षमता (ARAI Mileage) | ३२.२ किमी/लिटर (हायब्रिड मोड) |
| ० ते १०० किमी/तास वेग | ५.७ सेकंद |
| टॉप स्पीड (Top Speed) | २५० किमी/तास |
परिमाणे आणि क्षमता
| वैशिष्ट्य | तपशील |
|---|---|
| लांबी (Length) | ५,३०४ mm |
| उंची (Height) | १,५०३ mm |
| व्हीलबेस (Wheelbase) | ३,२१६ mm |
| एकूण वजन (Kerb Weight) | २,४६५ किलो |
| बूट स्पेस (Boot Space) | ५४० लिटर |
| इंधन टाकी क्षमता (Fuel Tank) | ६७ लिटर |
| बैठक क्षमता (Seating Capacity) | ४ ते ५ आसने (एक्झिक्युटिव्ह पॅकेजसह) |
किंमत
2026 मर्सिडीज बेंज एस क्लास S ४५०e प्लग इन हायब्रीड या वाहनाची सुरुवात एक्स शोरूम किंमत ₹ 2.20 कोटी आहे आणि त्याच वाहनाचे टॉप मॉडेल ची किंमत ₹ 2.38 कोटी पर्यंत मिळते.
मर्सिडीज बेंजने या कारचे बुकिंग अधिकृतपणे सुरू केलेले आहे हे मॉडेल थेट प्रदेशातून इम्पोर्ट केले जात असल्यामुळे कारची डिलिव्हरी यावर्षीच्या दिवाळी दरम्यान सुरू होणार आहे तर तुम्ही जवळच्या शोरूम मध्ये जाऊन ह्या कारच्या संबंधित चर्चा करू शकता.

निष्कर्ष
तुमच्याकडे जर चांगल्या प्रकारचा पैसा उपलब्ध असेल आणि त्या पैशांमध्ये लक्झरी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला खास आराम देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स सोबत तसेच तुम्हाला सुरक्षा प्रधान करण्यासाठी १५ एअरबॅक्स स्टॅंडर्ड यांसारख्या फीचर्स देऊन तुम्ही या वाहनाकडे आकर्षित असाल तर हे वाहन तुमच्यासाठीच आहे
यामुळे तुम्हाला जर हे २०२६ मर्सिडीज बेंज चे एस क्लास मॉडेल खरेदी करायचे असेल तर वरील दिलेल्या सर्व माहितीचे वाचन करून तुम्ही तुमचा निर्णय ठरवावा…




Leave a Reply