आपल्या कारसाठी आवश्यक ॲक्सेसरीज | Important Car Accessories For Indian Driver
आजच्या धावपळीच्या जीवनात कार आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनली आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते एक Dream कार असावी कारण त्याला ते आपले दुसरे घर वाटत असते. बायको मूल जेवढे जवळ तेवढी कार सुद्धा हृदयाच्या जवळ असतेच. त्यामुळे कित्येकजण आपली कार आरामदायक, सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवणे पहिली प्रायोरिटी समजतात. काही आवश्यक ॲक्सेसरीज (Car Accessories) आपल्या कारमध्ये असणे गरजेचे आहे जे अजून तुम्हाला कामाला येतील आणि वेळोवेळी मदत करतील. या लेखात आपण आपल्या कार च्या काही महत्त्वाच्या ॲक्सेसरीजची माहिती घेऊया:
1. डॅशकॅमरा (Dash Camera)
डॅशकॅमरा आजच्या काळात एक अत्यावश्यक ॲक्सेसरी बनला आहे आणि तो सर्वांच्या कार मध्ये असलाच पाहिजे असे मला वाटते. फेक अपघात, पोलिसांकडून कधी कधी चुकीचे चलन मारले जाते, car Insurance Claim सेटल करायला, स्वतःला निर्दोष साबित करायला या Dashcam फुटेज ची मदत होते. Dual चॅनेल Dashcam हा तुमच्या गाडीच्या पुढील आणि मागील दृश्यांचे रेकॉर्डिंग करतो, Dashcam हा एक तुमचा विश्वासू मित्र आहे प्रत्येक क्षणी मदतीला येणारच. म्हणून Dashcam हा लावाच. कमीत कमी HD Quality चा असावा. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/4kTuQ9P)
2. कार परफ्युम (Car Perfume)
घाम, पावसाचे पाणी यांमुळे कार मध्ये खूप घाण वास येतो जो गाडी चालवण्याची मजा घालवून टाकतो. Comfortable, Fresh वातावरणासाठी Car Accessorries मध्ये Perfume असणे तेवडेच गरजेचे आहे. चांगल्या व योग्य प्रतीचे कार परफ्युम वापरल्याने कारमधील दुर्गंधी दूर होते आणि एक सकारात्मक ऊर्जा व प्रसन्न वातावरण तयार होते त्यामुळे प्रवासाच आनंद द्विगुणीत होतो. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/4mcvRex)
3. टायर इन्फ्लेटर आणि पंक्चर किट (Tyre Inflator and Puncture Repair Kit)
आजकाल टायर पंक्चर फ्रॉड किंवा स्कॅम वाढत चालले आहेत, भामटे लोक एक पंक्चर असेल तेथे ४-५ पंक्चर काढून तुम्हाला ५००-६०० रुपयांचा indian Drivers ला चुना लावतात. स्वतः पंक्चर काढा आणि टायर वाचवा, इमरजेंसी मध्ये ही कला तुम्हाला खूप फायद्यात ठेवेल. अशा परिस्थितीत पंक्चर रिपेअर किट तुमच्यासाठी खूप कामाला येईल. गाडीच्या चाकात हवा योग्य असेल तर उत्तम मायलेज सुद्धा मिळते म्हणून टायर इन्फ्लेटर वापरून टायर मध्ये हवा योग्य ठेवा. Car Accessories मधील ही accessory मी खूप महत्वाची मानतो. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/46Sd9nJ आणि https://amzn.to/415uhme)
4. जीपीएस ट्रॅकर (GPS Tracker)
आजकाल गाडी चोरी करणे चोरांच्या डाव्या हाताचा खेळ, मित्राला, नातेवाईकांना गाडी दिली ते कशी ही गाडी चालवतायत, सर्व्हिस सेंटर वाले गाडीचा चुकीचा वापर करतायत,या सर्व गोष्टींसाठी ट्रॅकर खूप कामाचा, Wireless असेल तर अत्ती उत्तम. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/46mZyom)
5. कार मॅट्स (Car Mats)
गाडीचा Floor एक कापडी असतो, म्हणजे तो खराब होणार, पाणी पडले की वास मारणार, आणि तांबरा पण floor ला लागू शकतो, म्हणून कार एक्सेसरीज मध्ये Mats एक महत्वाची गोष्ट आहे. हे धूळ, पाणी, माती पासून वाचवतात आणि गाडीला एक प्रीमियम लुक देतात. [येथे खरेदी करा](लोकल Accessorry Shop मधून खरेदी करा )
6. सिरॅमिक ग्राफिन कोटिंग (Ceramic Graphene Coating)
कारच्या पेंटला वातावरणातील हानिकारक घटकांपासून, पक्षांच्या विष्टेपासून वाचवण्यासाठी सिरॅमिक ग्राफिन कोटिंग हा एक उत्तम पर्याय आहे. हे कोटिंग तुमच्या कारला एक चमकदार आणि नवीन लुक देते आणि त्याची स्वच्छता करणेही सोपे जाते. या Coating म्मुळे पेंट फिका पडत नाही आणि गाडीची रीसेल वॅल्यू सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या आणि कडक उन्हाळ्यात हे कोटिंग खूप फायदेशीर ठरते. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/3GTs5aP)
7. कार शॅम्पू (Car Shampoo)
आपली कार स्वच्छ आणि चकचकीत ठेवण्यासाठी चांगल्या प्रतीचा कार शॅम्पू (Neutral PH) वापरणे आवश्यक आहे. चुकीचा शॅम्पू वापरून गाडी स्वच्छ नाही अजून खराब होते आणि पैंट फिका पडून जातो. चांगला शॅम्पू घाण आणि माती साफ करतो आणि कारला चमक देतो. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/4m9amLr)
8. ग्लास पॉलिश (Glass Polish)
कार ची काच स्वच्छ नसेल तर समोरचे दृश्य नीट दिसणार नाही आणि एक्सीडेंट शक्यात वाढते. बऱ्याच वेळेस बोअरिंग चे पाणी आणि चुकीचा शैम्पू गाडीची काच खराब करून टाकतात आणि रात्री ग्लेअर सुद्धा तयार होतात. कारच्या काचा स्वच्छ आणि स्पष्ट असणे सुरक्षित ड्राइव्हिंगसाठी खूप महत्त्वाचे आहे. यासाठी ग्लास पॉलिश ही एक महत्वाची कार अक्सेसरीज १५ दिवसातून एकदा नक्की वापरा. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/4140AC4)
9. देवांची मूर्ती (God’s Statue)
आपल्या कारमध्ये आपल्या आराध्य दैवतांची मूर्ती ठेवणे म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा तयार करणे. मी आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती ठेवतो. त्यांच्या विचारांमुळेच मला प्रेरणा मिळते. कधीच हरक्यासारखे जाणवत नाही. जय शिवराय 👏[येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/452TrTT)
10. व्हॅक्यूम क्लीनर (Vacuum Cleaner)
कार मेंटेन करताना कारच्या आतील (Interior Cleaning) स्वच्छता राखण्यासाठी छोटा आणि पोर्टेबल व्हॅक्यूम क्लीनर खूप उपयुक्त आहे. याच्या मदतीने तुम्ही सीट, फ्लोअर मॅट्स आणि डॅशबोर्डवरील धूळ आणि कचरा सहज साफ करू शकता. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/4kQTrfK)
11. मायक्रोफायबर कापड (Microfibre Cloth)
गाडी पुसायची झाली की कार एक्सेसरी लागते म्हणजे उत्तम दर्जाच कापड जे गाडीवर स्क्रॅचेस किवा स्वर्ल मार्क्स पाडणार नाहीत. जास्तीत जास्त मऊ कापड घेणे फायद्याचे. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/46mA62j)
12. टायर आणि ट्रिम रेस्टोरर (Tyre and Trim Restorer)
ठराविक वेळेनंतर गाडीचे प्लास्टिक पार्ट पांढरे पडायला लागतात आणि गाडीचे टायर खराब असतील तर कार जुनी वाटायला लागते. म्हणून टायर आणि प्लास्टिकच्या पार्ट्सना नवीन आणि चमकदार लुक देण्यासाठी टायर आणि ट्रिम रेस्टोररचा वापर केला जातो. यामुळे गाडी कशी नवीन सारखी दिसते. [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/4o1fgff)
13. वॅक्स ट्रीटेड डस्टर (Wax Treated Duster) Car Maintenance Accessories मधील सर्वात महत्वाची गोष्ट वॅक्स ट्रीटेड डस्टर. एखादा पावसाळा संपला की कार वर फक्त उरते सुखी धुळ आणि त्यासाठी तुम्ही जर गाडी रोज धुणार असाल तर कार वर स्क्रॅच पडू शकतात, स्वर्ल मार्क्स येतात, कलर फिका होतो, रोज धुण्याने तांबरा लागू शकतो. Duster ला वॅक्स Treatment केली असल्यामुळे गाडीवरील सर्व धूळ डस्टर खेचून घेतो आणि गाडी नवीन सारखी चमकते, या डस्टर मुळे स्क्रॅचेस पडत नाहीत आणि रोज गाडी धुण्याचा त्रास संपला म्हणून समजा.
[येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/44YeW8u)
14. टिश्यू बॉक्स (Tissue Box)
प्रवासात टिश्यू पेपर नेहमी उपयोगी ठरतात हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कारमध्ये एक चांगला टिश्यू बॉक्स असणे आवश्यक आहे. स्वछ राहून कार चालवणे म्हणजे उत्तमच [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/3IEkrS4)
15. जंप स्टार्टर (Jump Starter)
अनेकदा बॅटरी डाउन झाल्यामुळे कार सुरू होत नाही. Emergency परिस्थितीत जंप स्टार्टर तुम्हाला मदत करू शकते. दुसऱ्या गाडीची गरज भासल्याशिवाय तुम्ही स्वतःच्या गाडीला स्टार्ट करू शकता. जेव्हावेळ खराब असते तेह्वा जम्प स्टार्टर सोबत असतो [येथे खरेदी करा](Affiliate link :- https://amzn.to/3UbUhZH)
16.Bonus( Wireless Android Auto Apple Car Play Adapter) आजकाल टोपेंड गाड्यांमध्ये अजूनही वायर वापरावी लागते ऐपल कार प्ले वापरण्यासाठी, ६० लाखाच्या गाडीची किंमत थोडी कमी होवून जाते. या Adapter ने गाडीला बनवा Smart [येथे खरेदी करा] (Affiliate link :- https://amzn.to/3TSKJma)
निष्कर्ष:
आज तुम्ही कार तुमच्या घरा सारखी ठेवाल तर ती कधीच त्रास देणार नाही. तुमच्यासाठी सदैव तयार राहील.
वर नमूद केलेल्या ॲक्सेसरीज तुमच्या कारला अधिक आरामदायक, सुरक्षित आणि आकर्षक बनविण्यात मदत करू शकतात. बाकीच्या अक्सेसरीज जसे की सीट कव्हर , टच स्क्रीन, रिअर कैमरा लोकल ठिकाणी लावू शकता जर गाडीमध्ये नसेल तर. तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार या ॲक्सेसरीजचा वापर करून तुम्ही कार ड्राइविंग अधिक आनंददायी, सुलभ बनवू शकता. तुमच्या कारसाठी तुम्ही कोणत्या ॲक्सेसरीज वापरता, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!