भारतातील सर्वोत्तम १२ सेकंड हँड कार्स: खरेदी करण्याआधी जाणून घ्या सर्वकाही
आजच्या काळात स्वतःची कार असणे ही गरज बनली आहे. कधी इमरजेंसी येईल सांगता येत नाही. पण नवीन कार खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही. अशा वेळी सेकंड हँड कार हा एक उत्तम पर्याय ठरतो. जुनी गाडी घेतल्याने तुमचे लाखों रुपये वाचतात आणि तुम्हाला तुमच्या गरजेनुसार चांगली गाडी मिळू शकते. पण जुनी गाडी खरेदी करताना अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. गाडीची स्थिती, मायलेज, देखभालीचा खर्च आणि बाजारातील मागणी, सेफ्टी या सगळ्याचा विचार करावा लागतो.
या लेखात, आम्ही सेकंड हँड कार बाजारात सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या १२ मॉडेल्सची सविस्तर माहिती देणार आहोत. या गाड्या त्यांच्या टिकाऊपणा, कमी देखभालीचा खर्च आणि चांगल्या रिसेल व्हॅल्यूसाठी ओळखल्या जातात. यापैकी चांगली गाडी मिळाली तर लगेच उचला.
१. मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)
लोकप्रियता: अल्टो ही भारताची पहिली कार मानली जाते. हिला लॉर्ड आल्टो सुद्धा म्हणतात. शहरातल्या गर्दीत किंवा डोंगरात चालवण्यासाठी ही गाडी सर्वोत्तम आहे, कॅपबेल आहे.
इंजिन (Engine): जुन्या मॉडेल्समध्ये ८०० सीसी (0.8L) F8D पेट्रोल इंजिन आणि नवीन मॉडेल्समध्ये १००० सीसी (1.0L) K10B पेट्रोल इंजिन.
फायदे: खूप कमी किंमत, देखभाल खर्च कमी, कुटेही होतो, सुटे भाग सहज उपलब्ध आणि मायलेज उत्तम. जुन्या गाड्यांच्या बाजारात तुम्हाला १ ते ३ लाख रुपयांमध्ये चांगली अल्टो मिळू शकते.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १८ ते २० किमी प्रति लिटर
- सीएनजी: २५ ते ३० किमी प्रति किलो
तोटे: लहान जागा, आधुनिक फीचर्सची कमतरता आणि हायवेवर जास्त वेगाने चालवण्यासाठी ही योग्य नाही, सेफ नाही.
२. मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)
लोकप्रियता: तरुणांमध्ये आणि लहान कुटुंबांमध्ये स्विफ्ट खूप लोकप्रिय आहे. प्रत्येकाचे पहिले प्रेम स्विफ्ट असेलच. याचा स्पोर्टी लूक आणि चांगल्या ड्रायव्हिंग अनुभवामुळे या गाडीची मागणी कायम असते.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १२०० सीसी (1.2L) K-Series पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १३०० सीसी (1.3L) DDiS (फिएटचे मल्टीजेट) डिझेल इंजिन.
फायदे: आकर्षक डिझाइन, उत्कृष्ट मायलेज, पुरेसे फियरचर्स, कमी देखभाल खर्च आणि चांगली रिसेल व्हॅल्यू.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १८ ते २० किमी प्रति लिटर
- डिझेल: २२ ते २४ किमी प्रति लिटर
तोटे: मागच्या सीटवर जागा थोडी कमी वाटू शकते आणि जुन्या मॉडेल्समध्ये काही ठिकाणी रस्ट (गंज) येण्याची समस्या दिसून येते. सेफ्टी कंसर्न असेल तर टाळावे.
३. होंडा सिटी (Honda City)
लोकप्रियता: होंडा सिटी ही सेडान सेगमेंटमधील एक ‘लेजेंडरी’ कार आहे. तिच्या प्रीमियम फीचर्स, आरामदायी ड्रायव्हिंग आणि विश्वासार्ह इंजिनमुळे ती आजही लोकांची आवडती आहे.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १५०० सीसी (1.5L) i-VTEC पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १५०० सीसी (1.5L) i-DTEC डिझेल इंजिन.
फायदे: प्रशस्त आणि आरामदायक इंटिरियर, कमी खर्च देखभालीचा, दमदार परफॉर्मन्स, होंडाची विश्वासार्हता आणि चांगली रिसेल व्हॅल्यू. लाँग ड्राइव साठी खूप चांगली. सीएनजी बाहेरून लावून चालवू शकता.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १४ ते १७ किमी प्रति लिटर
- डिझेल: २० ते २२ किमी प्रति लिटर
तोटे: जास्त जुन्या डिझेल, पेट्रोल मॉडेल्सचा देखभाल खर्च थोडा जास्त असू शकतो आणि काही पार्ट्स महाग असू शकतात.
४. मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)
लोकप्रियता: ‘टॉल बॉय’ म्हणून ओळखली जाणारी वॅगनआर ही तिच्या प्रशस्त जागेमुळे कौटुंबिक वापरासाठी एक उत्तम पर्याय आहे. सर्व आई वडिलांची आवडती ही कार.
इंजिन (Engine): जुन्या मॉडेल्समध्ये १००० सीसी (1.0L) K10B/C पेट्रोल इंजिन, तर काही जुन्या मॉडेल्समध्ये ११०० सीसी (1.1L) F10D पेट्रोल इंजिन.
फायदे: शहरात वापरण्यासाठी खूप उपयुक्त, उत्तम मायलेज, कमी देखभाल खर्च आणि भरपूर स्पेस.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १७ ते २१ किमी प्रति लिटर
- सीएनजी: २८ ते ३२ किमी प्रति किलो
तोटे: तिचा डिझाइन काही लोकांना आवडत नाही आणि वेग जास्त असताना गाडी थोडी अस्थिर वाटू शकते. सेफ पण नाही हेही खरेच.
५. फोर्ड इकोस्पोर्ट (Ford EcoSport)
लोकप्रियता: अमेरिकेची ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही आपल्या मजबूत बांधणीसाठी आणि दमदार इंजिनसाठी ओळखली जाते. एवढी स्ट्रॉंग आहे की ती टैंक सारखी वाटते.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १५०० सीसी (1.5L) Ti-VCT पेट्रोल इंजिन आणि प्रसिद्ध १००० सीसी (1.0L) EcoBoost टर्बो-पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १५०० सीसी (1.5L) TDCi डिझेल इंजिन.
फायदे: चांगल्या ड्रायव्हिंगचा अनुभव, मजबूत आणि सुरक्षित बिल्ड क्वालिटी, अनेक फीचर्स. चालवण्याची मजा भारीच आहे.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १५ ते १७ किमी प्रति लिटर
- डिझेल: २० ते २२ किमी प्रति लिटर
तोटे: फोर्डने भारतातील आपला व्यवसाय बंद केल्यामुळे पार्ट्स मिळवणे थोडे कठीण होऊ शकते आणि देखभाल खर्चही वाढू शकतो.
६. टोयोटा इनोव्हा (Toyota Innova)
लोकप्रियता: मोठ्या फॅमिली साठी पहिली चॉइस. इनोव्हा ही तिच्या टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि प्रशस्त जागेमुळे भारतातील सर्वात लोकप्रिय एमपीव्ही आहे. टॅक्सी सेगमेंटमध्येही ती खूप लोकप्रिय आहे.
इंजिन (Engine):
- डिझेल: जुन्या मॉडेल्समध्ये २५०० सीसी (2.5L) D-4D डिझेल इंजिन.
फायदे: उत्कृष्ट स्पेस आणि आराम, लाखो किलोमीटर चालल्यावरही मजबूत इंजिन, टोयोटाची विश्वासार्हता आणि खूप चांगली रिसेल व्हॅल्यू.
अंदाजे मायलेज:
- डिझेल: ०८ ते १४ किमी प्रति लिटर
तोटे: देखभालीचा खर्च थोडा जास्त आहे आणि जुन्या गाड्यांची किंमतही जास्त असते.
७. फोक्सवॅगन पोलो जीटी (Volkswagen Polo GT)
लोकप्रियता: भारतात बंद झाली पण पोलो जीटी ही तिच्या ‘फन टू ड्राइव’ (fun to drive) अनुभवासाठी आणि युरोपियन बिल्ड क्वालिटीसाठी प्रसिद्ध आहे. तरुण मुलांच्या गळ्यातील टायट.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १२०० सीसी (1.2L) TSI टर्बो-पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १५०० सीसी (1.5L) TDI डिझेल इंजिन.
फायदे: उत्कृष्ट ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, प्रीमियम बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षितता. ड्वसाइन सुद्धा मस्तच आहे.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १२ ते १६ किमी प्रति लिटर
- डिझेल: १९ ते २२ किमी प्रति लिटर
तोटे: देखभाल खर्च इतर गाड्यांच्या तुलनेत खूप जास्त असतो, पार्ट्स महाग असतात आणि काही स्पेअर पार्ट्स मिळायला वेळ लागतो.
८. टोयोटा कोरोला अल्टिस (Toyota Corolla Altis)
लोकप्रियता: ही एक लक्झरी सेडान आहे, जी तिच्या आरामदायी ड्रायव्हिंगसाठी आणि टोयोटाच्या इंजिनच्या विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. खूप लांब गाडी आणि भरपूर फीचर्स.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १८०० सीसी (1.8L) पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १४०० सीसी (1.4L) D-4D डिझेल इंजिन.
फायदे: खूप आरामदायक प्रवास, विश्वासार्ह आणि टिकाऊ इंजिन, प्रीमियम फील.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १२ ते १६ किमी प्रति लिटर
- डिझेल: १८ ते २० किमी प्रति लिटर
तोटे: पार्ट्स महाग असतात.
९. ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta)
लोकप्रियता: भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये क्रेटाने मोठे नाव कमावले आहे. तिच्या आकर्षक डिझाइन, दमदार इंजिन आणि आधुनिक फीचर्समुळे तिची मागणी कायम जास्त असते. २०१५ मध्ये लॉनच झालेली गाडी आजही लोकांच्या मनात घर करू आहे.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १६०० सीसी (1.6L) VTVT पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १६०० सीसी (1.6L) CRDi डिझेल इंजिन.
फायदे: आधुनिक फीचर्स, आरामदायी इंटिरियर, पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये चांगली कामगिरी. ग्राउंड क्लीयरेंस. लाँग ड्राइव साठी उत्तम.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १० ते १७ किमी प्रति लिटर
- डिझेल: १८ ते २१ किमी प्रति लिटर
तोटे: रिसेल व्हॅल्यू चांगली असली तरी, गाडीची किंमत इतर कॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षा जास्त असू शकते.
१०. ह्युंदाई आय १० आणि आय २० (Hyundai i10 & i20)
लोकप्रियता: ह्युंदाई आय १० ही मारुती स्विफ्ट ला टक्कर देणारी एक उत्तम हॅचबॅक आहे, तर आय २० ही तिच्या अधिक जागा आणि फीचर्ससाठी ओळखली जाते. २०१२ ला ही ह्युंदाई ची पहिली चॉइस लोकांसाठी होती.
इंजिन (Engine):
- ह्युंदाई आय १०: ११०० सीसी (1.1L) iRDE आणि १२०० सीसी (1.2L) Kappa पेट्रोल इंजिन.
- ह्युंदाई आय २०: १२०० सीसी (1.2L) Kappa पेट्रोल आणि १४०० सीसी (1.4L) CRDi डिझेल इंजिन.
फायदे: शहरात आणि हाईवे वर वापरण्यासाठी उत्तम, आकर्षक डिझाइन, चांगले फीचर्स आणि कमी देखभाल खर्च.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १२ ते १९ किमी प्रति लिटर
- सीएनजी: १७ ते २५ किमी प्रति किलो
तोटे: शहरात मायलेज कमी मिळते आणि सेफ्टी पुरेशी वाटत नाही.
११. मारुती सुझुकी बलेनो (Maruti Suzuki Baleno)
लोकप्रियता: बलेनो ही एक प्रीमियम हॅचबॅक आहे, जी तिच्या प्रशस्त इंटिरियर आणि आधुनिक डिझाइनसाठी ओळखली जाते.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १२०० सीसी (1.2L) K-Series पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १३०० सीसी (1.3L) DDiS डिझेल इंजिन. (जुन्या मॉडेल्समध्ये उपलब्ध)
फायदे: प्रशस्त जागा, चांगले फीचर्स, उत्कृष्ट मायलेज आणि कमी देखभाल खर्च.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १५ ते २२ किमी प्रति लिटर
तोटे: काही लोकांना तिची बिल्ड क्वालिटी हलकी वाटू शकते.
१२. मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire)
लोकप्रियता: कॉम्पॅक्ट सेडानमध्ये डिझायर ही सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. कौटुंबिक वापरासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी ती एक चांगला पर्याय आहे.
इंजिन (Engine):
- पेट्रोल: १२०० सीसी (1.2L) K-Series पेट्रोल इंजिन.
- डिझेल: १३०० सीसी (1.3L) DDiS डिझेल इंजिन.
फायदे: उत्तम मायलेज, कम्फर्टेबल, कमी देखभाल खर्च, मोठे बूट स्पेस आणि मारुतीची विश्वासार्हता.
अंदाजे मायलेज:
- पेट्रोल: १५ ते २१ किमी प्रति लिटर
- डिझेल: २० ते २५ किमी प्रति लिटर
- सीएनजी: २८ ते ३० किमी प्रति किलो
तोटे: टॅक्सी म्हणून जास्त वापरल्यामुळे गाडी घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. सेफ्टी चा सुद्धा अभाव जाणवू शकतो.
सेकंड हँड कार खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
- सर्व्हिस रेकॉर्ड तपासा: गाडीचा जुना सर्व्हिस रेकॉर्ड नक्की तपासा. नियमित देखभाल झालेली गाडी घेणे नेहमीच फायदेशीर असते.
- गाडीची तपासणी करा: अनुभवी मेकॅनिकला घेऊन जा. इंजिन, गिअरबॉक्स, सस्पेंशन आणि बॉडीची स्थिती नीट तपासा.
- टेस्ट ड्राइव्ह घ्या: गाडी चालवून बघा. इंजिनचा आवाज, ब्रेक आणि गिअरबॉक्सची कामगिरी तपासा.
- कागदपत्रे तपासा: आरसी (RC), विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) आणि गाडीच्या कर्जाचे (loan) सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
या १२ गाड्या महाराष्ट्राच्या सेकंड हँड बाजारात त्यांच्या कामगिरी, विश्वासार्हता आणि कमी देखभाल खर्चामुळे खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार यापैकी कोणत्याही गाडीची निवड करू शकता. सेकंड हँड कार खरेदी करताना योग्य तपासणी केल्यास तुम्ही एक चांगला सौदा करू शकता.
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर, अधिक उपयुक्त माहितीसाठी आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा
Instagram
Facebook
Twitter
Threads
Youtube
तुम्हाला हा लेख देखील वाचायला आवडेल.
डॅशकॅम म्हणजे काय?