मान्सूनमध्ये (Mansoon) तुमच्या कारची घ्या विशेष काळजी: अतिशय उपयुक्त अश्या टिप्स / Car Care Tips in Mansoon

  • Home
  • मान्सूनमध्ये (Mansoon) तुमच्या कारची घ्या विशेष काळजी: अतिशय उपयुक्त अश्या टिप्स / Car Care Tips in Mansoon

पावसाळा (Rainy Season) हा सर्वांच्या आवडीचा, सर्वत्र हिरवेगार, प्रत्येकजण निसर्ग सौंदर्य पाहायला बाहेर पडतोच पण मधेच तुमची गाडी बंद पडली तर सर्व ट्रिप मजा निघून जाते आणि तो उरतो तो फक्त त्रास. मुसळधार पाऊस, पाणी साचलेले रस्ते, कमी दृश्यमानता आणि रस्त्यांवरील चिखल यामुळे गाडी चालवणे अधिक धोकादायक बनते. म्हणून मान्सून सुरू होण्यापूर्वी आणि पावसाळ्यातही तुमच्या लाडक्या गाडीची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे केवळ तुमचे आणि तुमच्या सहप्रवाशांचे प्राण सुरक्षित राहतात असे नाही, तर तुमच्या गाडीचे आयुष्यही वाढते, तुम्हाला अनावश्यक खर्चापासून मुक्ती मिळते आणि महत्वाच्या वेळेस तुम्हाला तुमची गाडी धोका देत नाही.

marathiautoguru.com च्या या विशेष लेखात आपण मान्सूनमध्ये (Mansoon) कारची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व टिप्स सविस्तरपणे मांडल्या आहेत.

१. टायर आणि ब्रेक्सची तपासणी (Tyre & Brakes): सुरक्षिततेची (safety) पहिली पायरी,
पावसाळ्यात टायर आणि ब्रेक्स हे तुमच्या गाडीचे सर्वात महत्त्वाचे घटक असतात. ओल्या किंवा पाणी साचलेल्या रस्त्यांवर गाडी घसरण्याचा (Aquaplaning or Hydroplaning) धोका खूप जास्त असतो.
* टायरची स्थिती: तुमच्या गाडीच्या टायरची ‘ट्रेड डेप्थ’ (Tread Depth) किमान २ मिमी पेक्षा जास्त असल्याची खात्री करा. जर ती कमी असेल, तर टायर बदलण्याची वेळ आली आहे. योग्य ट्रेड डेप्थमुळे टायरला रस्त्यावर चांगली पकड (Grip) मिळते. टायरमध्ये योग्य हवा म्हणजेच कंपनी रिकमेंड हवा (pressure) असणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
* ब्रेक्सची (Brakes) तपासणी: ओल्या रस्त्यांवर ब्रेक्सची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे, पावसाळ्यापूर्वी तुमच्या गाडीच्या ब्रेक्सची पूर्ण तपासणी करून घ्या. ब्रेक पॅड्स, ब्रेक फ्लुईड आणि ब्रेक कॅलिपर योग्य स्थितीत असल्याची खात्री करा. अचानक ब्रेक लावणे टाळा आणि हळूवारपणे ब्रेकचा वापर करा. ब्रेक डिस्क सुद्धा सुस्थितीत असावी.

२. लाईट्स आणि वायपर्स (Lights & Wipers): स्पष्ट दृश्यमानतेसाठी ( Proper Visbility) आवश्यक.
पावसाळ्यात, विशेषतः मुसळधार पाऊस किंवा धुक्यामध्ये दृश्यमानता खूप कमी होते.
* गाडीचे दिवे (Lights): हेडलाईट्स, टेललाईट्स, फॉग लाईट्स आणि टर्न सिग्नल्स (इंडिकेटर) व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. सर्व lights छान स्वच्छ पुसून घ्या जेणेकरून ब्राइटनेस चांगला मिळेल. गरज पडल्यास बल्ब बदला. दिवसाही धुके किंवा जोरदार पाऊस असल्यास हेडलाईट्स चालू ठेवा फॉग लाइट्स चा वापर करा.
* वायपर्सची (Wiper) तपासणी: उन्हाळ्यात Wipers Hard झालेले असतात, हेच जुने आणि खराब झालेले वायपर ब्लेड्स पावसाचे पाणी योग्यरित्या साफ करू शकत नाहीत, ज्यामुळे समोरचे दृश्य ( Visibility Problem) धूसर दिसते व अपघात होण्याचे कारण बनते. पावसाळ्यापूर्वी वायपर ब्लेड्स (Wiper Blades) बदलून घ्या. वायपर आर्म्स ढिले झाले असल्यास ते घट्ट करून घ्या. विंडशिल्ड नियमितपणे स्वच्छ करा. Water Repellent Prduct चा वापर करा.

३. बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सिस्टिम (Battery and Electricals): शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी.
पावसाळ्यात गाडीतील इलेक्ट्रिकल सिस्टिममध्ये पाणी शिरल्यास शॉर्ट सर्किट किंवा बॅटरी डिस्चार्ज होण्याचा धोका असतो.
* बॅटरी तपासणी: बॅटरी टर्मिनल्स स्वच्छ आणि गंजमुक्त असल्याची खात्री करा. बॅटरीची चार्जिंग क्षमता तपासा, विशेषतः जर बॅटरी जुनी असेल.
* वायरिंगची तपासणी: गाडीतील सर्व वायरिंग आणि फ्यूज कंपोनंट्स व्यवस्थित इन्सुलेटेड (insulated) आहेत याची खात्री करा. कोणतीही उघडी वायर असल्यास ती दुरुस्त करून घ्या.

४. गाडीचा बाह्य भाग आणि गंज प्रतिबंधक उपाय(Exterior of Car & Antirust Coating):-
पावसाचे पाणी आणि हवेतील आर्द्रता यामुळे गाडीला गंज लागण्याचा धोका वाढतो.
* अँटी-रस्ट कोटिंग (Antirust Coating): नवीन गाडी असेल तर गरज नाही पण गाडी जुनी झाली असेल किंवा खालून Speed braker ला लागली असेल तर पावसाळ्यापूर्वी तुमच्या गाडीला अँटी-रस्ट ट्रीटमेंट करून घ्या. यामुळे गाडीच्या खालच्या भागाला (underbody) गंज लागणार नाही.

* पीपीएफ, सेरामिक, वॅक्स कोटिंग (PPF, Ceramic or Wax ) : गाडीच्या पेंटला पावसाळ्यापासून वाचवण्यासाठी पीपीएफ, सेरामिक किंवा चांगल्या दर्जाचे वॅक्स कोटिंग करून घ्या. यामुळे पाणी पेंटवर टिकून राहत नाही आणि गाडीची चमक टिकून राहते. चिखलामुळे होणाऱ्या माइनर स्क्रॅचेस पासून पीपीएफ संरक्षण करते.
* गाडी झाडाखाली पार्क करू नका : पावसाळ्यात झाड पडण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून झाड पडल्यास मोठा खर्च येतो. insurance ( विमा) नक्की घ्या अश्या वेळीस कामाला येतो
* नियमित स्वच्छता( Car Washing) : पावसाळ्यात गाडी नियमितपणे धुवा, विशेषतः गाडीच्या खालच्या भागातील चिखल आणि घाण काढून टाका जेणेकरून गंज पकडणार नाही

५. गाडीचा आतील भाग: स्वच्छ आणि कोरडा ठेवा
पावसाळ्यात गाडीच्या आतमध्ये ओलावा आणि दुर्गंधी येण्याची शक्यता असते.
* रबर मॅट्सचा वापर करा जेणेकरून पाणी कापडी कार्पेटवर पडणार नाही. अश्या वेळेस गंज लागणे कुबट वास येणे या गोष्टींना सामोरे जावे लागते.
* AC आणि डिफॉगर: पावसाळ्यात गाडीच्या आतल्या काचेवर धुरकटपणा (fog) जमा होतो. हा धुरकटपणा काढण्यासाठी AC चा वापर करा आणि डिफॉगर सिस्टिम व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करा. AC मध्ये रिसर्क्युलेशन मोड बंद ठेवून बाहेरची हवा आत घेतल्यास धुरकटपणा लवकर निघून जातो.
* दुर्गंधी टाळा: गाडीतील कुबट वास टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचे कार परफ्यूम किंवा एअर फ्रेशनर वापरा.
* सनरूफ लीकेज चेक करा, Drainage Holes क्लीन करून घ्या.

६. महत्त्वाचे द्रवे (Fluids) आणि फिल्टर्सची (Filter) तपासणी
गाडीच्या कार्यक्षमतेसाठी विविध द्रवांचे प्रमाण आणि दर्जा तपासणे महत्त्वाचे आहे.
* इंजिन ऑइल: इंजिन ऑइलची पातळी आणि रंग तपासा. जर ते काळे झाले असेल, तर ते बदलण्याची वेळ आली आहे.
* कूलंट: कूलंटची पातळी आणि त्याचा मिक्स योग्य प्रमाणात असल्याची खात्री करा.
* ब्रेक फ्लुईड: ब्रेक फ्लुईडची पातळी योग्य आहे का ते तपासा.
* विंडशिल्ड वॉशर फ्लुईड: विंडशिल्ड वॉशर फ्लुईड टाकी पूर्ण भरलेली आहे आणि त्यात योग्य वॉशर सोल्युशन आहे याची खात्री करा, जेणेकरून काच स्वच्छ ठेवता येईल.
* एअर फिल्टर आणि एसी फिल्टर: पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असल्याने एअर फिल्टर आणि एसी फिल्टर लवकर खराब होऊ शकतात. त्यांची तपासणी करून गरज असल्यास बदलून घ्या. स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता.
७. ड्रायव्हिंग करताना घ्यावयाची काळजी (Tips For Driving in Rain)
गाडी मेंटेन करणे जेवढे महत्वाचे तेवडेच गाडी चालवताना खाली दिलेल्या काही टिप्स फॉलो करणे महत्वाचे.
* वेग कमी ठेवा (Avoid Speeding) : ओल्या रस्त्यांवर गाडी घसरण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे वेग नेहमी कमी ठेवा.
* सुरक्षित अंतर राखा (Keep Safe Distance): समोरच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवा, जेणेकरून अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास पुरेसा वेळ मिळेल अन्यथा अपघात होवू शकतो.
* पाण्यातून गाडी चालवणे टाळा ( Avoid Driving in Flood Area): पाणी साचलेल्या रस्त्यांवरून गाडी चालवणे टाळा. पाण्याचा अंदाज न आल्यास इंजिनमध्ये पाणी जाऊन नुकसान होऊ शकते (Hydro-locking). याचा दुरुस्तीचा खर्च खूप जास्त आहे.
* क्रूझ कंट्रोल टाळा (Avoid Cruise Control): पावसाळ्यात क्रूझ कंट्रोल वापरणे टाळा, कारण यामुळे ओल्या रस्त्यांवर गाडीवरील नियंत्रण गमावू शकता व हायड्रोप्लानिंग होवून अपघात होवू शकतो.
* पंक्चर दुरुस्ती किट (Puncture Repair kit): आपल्या गाडीत नेहमी पंक्चर दुरुस्ती किट किंवा स्टेपनी (extra tyre) आणि आवश्यक टूल्स सोबत ठेवा. Tyre इनफ्लेटर असेल तर अति उत्तम.
निष्कर्ष:
मान्सून (Mansoon) हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी तुमची गाडी (Vehicle) सुस्थितीत असणे आवश्यक आहे. वरील सर्व टिप्सचे पालन केल्यास तुम्ही तुमच्या गाडीची पावसाळ्यात उत्तम प्रकारे काळजी घेऊ शकता आणि सुरक्षित प्रवास करू शकता, तर गाडीची life वाढते आणि होणाऱ्या खर्चापासून वाचता येते. पावसाळ्यात आपल्या गाडीची ‘सर्व्हिसिंग’ करून घ्या आणि चिंतामुक्त होऊन पावसाळ्याचा आनंद घ्या!

Follow Us